Tuesday, February 10, 2009

प्रेम म्हणजे..

प्रेम म्हणजे....

दोस्तो...प्रेमाची सायंटिफिक व्याख्या करणं म्हणजे त्याच्यातली मजा घालवणं.प्रेम काय फिजिक्स , केमेस्ट्री अन् मॅथ्स आहे का प्रॅक्टीकलच्या आधी थेअरी शिकायला?प्रॅक्टीकली अनुभवल्याशिवाय प्रेम काय हे कोणीही सांगून कळत नाही.मुळात प्रेम म्हणजे काय ही सांगण्याची गोष्ट नाही.जसं गरम काय ,थंड काय हे जो तो अनुभवातून शिकतो तसंच प्रेम...प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं नि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकर म्हणतात.हीच लिंक पकडून काही प्रेमवीर म्हणतात , ''प्रेम म्हणजे ...रोज रात्री आकाशात तारा तुटतो का हे पाहाणं असतं..कारण त्या तुटणाऱ्या ताराकडे तो आपलाच व्हावा हे मागणं असतं.'' ''प्रेम म्हणजे..डोळे बंद केले तरी त्याचंच दिसणं असतं तर डोळे उघडताच त्याला शोधणं असतं..'' ''प्रेम म्हणजे ..प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं.पण त्याच्यासमोर मात्रं वेडुपणाचं वागणं असतं.'' ''प्रेम म्हणजे..आपल्याला कधी न आवडणाऱ्या गोष्टी तो भेटल्यावर त्याला आवडतात म्हणून आवडणं असतं.'' ''प्रेम म्हणजे ..त्याच्या गुणांवर तर भाळायचंच असतं.पण त्यापेक्षाही त्याचे दोष स्वीकारणं असतं..'' प्रेमाची लिमिट पहायची आहे? मग हे ऐका.. ''प्रेम म्हणजे..त्याचं ह्या जगातलं अस्तित्व संपल्यानंतरही निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळयात अश्रू असून सुध्दा ओठांवर हसू ठेवणं असतं..''

दोस्तो..ज्याला कोणाची ही प्रेमाची लिंक मिळाली त्याचं बाकी जगाशी लिंक फेल्युअर झालंच म्हणून समजा..काही अरसिक सायंटिस्ट लोक ह्याला निव्वळ ''केमिकल लोचा'' म्हणून मोकळे होतात पण पर्वा किसे है? ज्याला हा खरं प्रेम ही दुर्मिळ कस्तुरी लाभली उसने सबकुछ पा लिया.प्रेमात पडल्यावर माणसात जमिन अस्मानाचा फरक होतो.सारं जग ''आवडत्या माणसापाशी'' केंद्रित होतं.

''आवडत्या माणसाचा फोन येतो अन् आजुबाजूचं सगळं कंटाळवाणं जग अचानक सुंदर वाटायला लागतं.आवडता माणूस साधंसंच काहीसं बोलतो अन् नेमकं ते आपल्याला आवडणारं निघतं.आवडत्या माणसाने म्हटलेलं गाणं खूप खूप सुरेल वाटतं.आणि आवडत्या माणसाच्या नुसत्या आठवणीनेही खोल खोल उरात दाटतं...म्हणूनच आयुष्यात कुणाशी तरी जुळावंच आवडतं असं नातं..कारण आवडत्या माणसाला आपणही आवडल्याने अवघं आयुष्यं सुंदर होऊन जातं..''पण मित्रांनो..प्रेमाचे सुध्दा काही प्रकार असतात बरं का!

तीव्र भावनाप्रवण प्रेम म्हणजेच पॅशनेट लव्ह..ह्यात माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल सतत अगदी दिवसाचा प्रत्येक क्षण विचार करत असतो.ह्यात काही प्रमाणात शारिरिक भावना सुध्दा अंतर्भूत असतात.आणि तीव्र प्रकारचे भावनिक चढउतार असतात.

दयाबुध्दी असलेलं प्रेम म्हणजे कंपॅशनेट लव्ह...ह्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी तुमच्या मनात तीव्र दया , आपुलकी आणि काळजी असते.परंतू कमिटमेंट शिवाय कुठल्याच प्रेमाला अर्थ नाही.जोपर्यंत तुम्ही कमिटमेंट करून ती निभावत नाही तोपर्यंत तुमचं प्रेम नातं टिकणं निव्वळ अशक्य आहे.अनेक लोकांना प्रश्न पडतो की लव्ह ऍट फर्स्ट साईट हा प्रकार खरंच अस्तित्वात असतो का..तर त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की पहिल्यांदा होतं ते आकर्षण असतं.एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही.त्याची स्वभाववैशिष्टयं , त्याचे विचार , त्याच्या वागण्या बोलण्याच्या पध्दती आणि त्याचे गुण अवगुण निदान काही प्रमाणात जाणल्याशिवाय तरी खरं प्रेम होऊ शकत नाही.ज्यांच्या बाबतीत लव्ह ऍट फर्स्ट साईट घडतं त्यांचं ते पहिल्यांदा निव्वळ आकर्षण असतं आणि काळाच्या ओघात एकमेकांच्या सतत सहवासामुळे एकमेकांना जाणून घेतल्यावर प्रेमाला खऱ्या अर्थाने सुरूवात होते.आणि तेच प्रेम शेवटपर्यंत टिकतं ज्यात एकमेकांविषयी नितांत आदर , समजूतदारपणा,माया , आपुलकी आणि टोकाची कमिटमेंट असते! अनेक लोकांना हा ही प्रश्न पडतो की सुरूवातीला फील गुड असलेलं वातावरण काहीच दिवसांत तणावग्रस्त का होतं?सुरूवातीला एकमेकांसाठी आपणच परफेक्ट मॅच आणि मेड फॉर इच अदर हे फिलिंग असतं..पण का काहीच दिवसांत एकमेकांशी पटेनासं होतं?तर मग पाहूया असं का होतं ते..मित्रांनो प्रेमाच्या नात्याच्या  तीन स्टेजेस असतात.

पहिली स्टेज ः मेड फॉर इच अदर..

पहिली स्टेज म्हणजे अगदी सुरूवातीला तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट असण्याचा आटोकाट प्रयत्न करता.समोरच्याला आवडेल असंच बोलता ,वागता.समोरचा आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये म्हणून त्याच्या निगेटीव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करता.चुका विसरून जाता.आणि त्याच्या फक्त पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही हायलाईट करता.समोरची व्यक्ती सुध्दा एक्झॅक्टली सेम असंच वागत असते.ह्यामुळे होतं काय की एकमेकांच्या मनात एकमेकांविषयीच्या अपेक्षा खूप वाढून आपण समोरच्या व्यक्तीला नकळत गृहित धरायला लागतो.ह्यानंतर नातं पोहोचतं दुसऱ्या स्टेजमध्ये.

दुसरी स्टेज ः हे भगवान!ये मै कहाँ फस  गया...

आता रिलेशनला भरपूर दिवस उलटले असतात आणि स्वप्नांमधली नवी नवलाई संपून आपण जरा प्रॅक्टीकल विचार करायला लागलो असतो..एकमेकांच्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणं कठिण होऊन बसतं.मग ह्यातूनच जन्म घेतात अनेक प्रकारचे समज गैरसमज, रूसवे फुगवे , अपेक्षाभंग,  भांडणं आणि मनस्ताप.असं प्रत्येकाच्याच बाबतीत घडेल असं नाही.पण बहुतांश नात्यांमध्ये असं होतं.ही दुसरी स्टेज नात्यातली सगळयात कठिण स्टेज आहे.कारण ह्या स्टेजमध्ये आपण एकमेकांच्या सगळयाच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.एकमेकांच्या चुका माफ करू शकत नाही.एकमेकांचे दोषच ते काय आपल्याला दिसतात आणि ''कुठुन ह्या रिलेशनमध्ये पडलो'' असं निगेटिव्ह फिलिंग येतं.छोटया छोटया गोष्टींमध्ये होणारे अपेक्षाभंग सहन होत नाहीत आणि मग नातं अतिशय नाजूक वळणावर येऊन ठेपतं.ह्या वळणावर जर एकमेकांविषयीचं तीव्र प्रेम जागृत राहिलं आणि कमिटमेंट स्ट्राँग असलं तर तुमचं जहाज ह्या वादळातून सहीसलामत बाहेर पडतं.पण एकमेकांविषयी विश्वास नसणे , नीट कम्युनिकेशन नसणे किंवा मॅच्युरिटीचा अभाव , इगो प्रॉब्लेम ह्यामुळे बरीचशी नाती ह्या दुसऱ्या स्टेजलाच येऊन तुटतात आणि विनाकारण लोकांचा प्रेमाविषयीचा विश्वास उडतो.ह्या कठिण स्टेजमध्ये एकमेकांना समजून घेऊन सोबत चाललं , आरश्यासारखी क्लिअरीटी ठेवली , प्रेम आणि विश्वास मनात जागृत ठेवला तर तुमचं नातं ह्या आगीतून तावून सुलाखून बाहेर पडतं व सगळे गैरसमज जळून जाऊन उरतं अस्सल शुध्द चोवीस कॅरेट सोन्यासारखं शुध्द प्रेम.

तिसरी स्टेज ःलव्ह इज हेवन..

दुसऱ्या स्टेज मध्ये एकमेकांच्या अपेक्षा आणि लिमिटेशन्स कळल्यावर जर दोघांचंही एकमेकांवर खरं प्रेम असेल तर ते एकमेकांना एकमेकांच्या गुणदोषांसकड स्वीकारतात.कारण ते एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाहीत.दुसऱ्या स्टेजमधून मात्रं तिसऱ्या स्टेजमध्ये प्रयत्नपूर्वक यावं लागतं.सुृरूवातीला काही गोष्टी अगदी ठरवून कराव्या लागतात.एकमेकांच्या काही गोष्टी समजून घेणं , मॅच्युरिटीने  वागणं , प्रयत्नपूर्वक नात्यात क्लिअरीटी ठेवणं , एकमेकांचा काही प्रमाणात गमावलेला विश्वास परत मिळवणं ह्यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक जपाव्य लागतात.सुरूवातीला नातं टिकवण्यासाठी आणि नात्यातला ओलावा परत आणण्यासाठी ठरवून कराव्या लागणाऱ्या ह्याच गोष्टी नंतर एकमेकांवरच्या उत्कट प्रेमामुळे तुम्ही आपोआपच नकळत करू लागता आणि तुमचं नातं अतिशय स्ट्राँग होतं.तुम्ही पुन्हा पहिल्या स्टेजसारखे प्रेमाचा आनंद घेऊ शकता.एकमेकांविषयी वाटणारी काळजी , आपुलकी ह्यात मॅच्युरिटी आणि अंडरस्टॅंडिंग ची भर पडल्यामुळे तुम्ही दृष्ट लागण्यासारखे सुखी होता.प्रेमातच स्वर्ग आहे असं तुम्ही अनुभवता.तुमचं नातं ज्या क्षणाला दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्या स्टेजमध्ये प्रवेश करतं तेव्हापासूनच तुमचं नातं इतकं दृढ होत जातं की मग नंतर तुम्ही एकमेकांपासून कधीच दुरावल्या जात नाही.कोणीही तुम्हाला एकमेकांपासून तोडू शकत नाही.

दोस्तो प्रेम आणि आयुष्य दोन्हीही गोष्टी खूप सुंदर आहेत!

 

 ' प्रेम' केवळ अडीच अक्षरंकेवळ या अडीच अक्षरांच्या माध्यमातुन आपण आपल्या भावना व्यक्त करीत असतोअसं म्हणतात की मानव हा सदैवं प्रेमाचा भुकेला असतोत्याला असं सतत वाटत असतं की जगात एक तरी व्यक्ती अशी असावी जी त्याला किंवा तिला समजु शकेल,अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीजवळ आपण आपल्या भावनांचं शेअरींग करू शकू ,असं कुणी तरी ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण आपल्या अश्रुंना वाट मोकळी करू शकू ,असं कुणीतरी ज्याच्यासोबत आपण मनमोकळेपणाने हसू शकू  मित्रहो प्रत्येकालाच असं वाटत असतं

 

'' कोई होता जिसको अपना,हम अपना कह सकते यारो

पास नही पर दुरही होता,लेकीन कोई मेरा अपना''

प्रत्येकाला अशी एखादी 'खास' व्यक्ती जीवनात यावी ही ईच्छा असतेआणि त्यात वावगं असं काहीही नाहीकारण शेवटी हा मानवी स्वभाव आहेया संपूर्ण विश्वात केवळ मानवच असा आहे जो स्वतःच्या भाव-भावनांना वेगवेगळया तऱ्हेने मांडु शकतोस्वतःच्या भावनांना व्यक्त करणे हा काही गुन्हा थोडीच आहेत्या खासम खास व्यक्तीनं आपलं ऐकावं,सादास प्रतिसाद दयावा अशी आपली छोटीशी आशा असतेसुरेश भट म्हणतात की,

 '' माझी उदास गीते तू ऐकतोस का रे? अन् आसवांत माझ्या तू नाहतोस का रे?

येताच तू समोरी मी दर्वळून जाते माझ्यासमान तूही गंधोळतोस का रे? ''

अशा व्यक्तीची आपण अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतोकधी-कधी तर आपण प्रत्येकामध्ये त्या 'खास' व्यक्तीला शोधत असतोअगदी निसर्गातील प्रत्येक घटकात आपण त्या व्यक्तीला बघत असतोएक दिवस असा येतो की आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळतेही तीच व्यक्ती असते ज्या व्यक्तीच्या प्रतिक्षेत आपण रात्रं-दिवस अगदी झुरत असतोती व्यक्ती आज आपल्याला मिळालेली असते अशा वेळी आपलं मन अगदी मनमयूर होवून नाचायलं लागतं आणि म्हणु लागतं

 

'' तू माझ्या आयुष्याची पहाट तू माझ्या कैफाची मत्त लाट

तू मागील जन्मांची आर्त साद तू मानसकुंजातील वेणूनाद''

हीच ती व्यक्ती असते जी आपल्याला समजु शकत असते,हीच ती व्यक्ती असते जिच्याजवळ आपण आपल्या भावनांचं शेअरींग करू शकतो,हीच ती व्यक्ती असते जिच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत असतोअगदी कधीही न हसणारे आपण खळखळून हसायला लागतो आणि कळत नकळत पणे आपल्याला जाणीव होते की हे दुसरं तिसरं काही नसून प्रेम आहे

 

'' मनी मनांशी प्रेमच केवळ आज निरंतर उरले आहे

बागेतल्या फुलांसंगे मन तुझ्याशी जूळले आहे''

मित्रहो असं म्हणतात की , प्रेमाचं गणित हे जरा वेगळंच असतं व्यवहारीक जीवनात भलेही एक आणि एक मिळुन दोन होत असतील पण प्रेमाच्या गणितात मात्र दोघे मिळून एक होत असतात असं हे प्रेमाचं गणित प्रत्येकालाच जमेल असंही नाहीआपण म्हणतो, ''शादी एक एैसा लड्डु है, जो खाए वो पछताए और जो ना खाए, वो भी पछताए'' काहीसं असंच प्रेमाचं असतं

 

'' आज माझा श्वासश्वास सुंगधकल्लोळ आज माझा शब्दशब्द प्रकाशाचा लोळ

विसराळू आयुष्याला पुन्हा सापडली तुझ्यामाझ्या कवितेची हारपली ओळ''

दोस्तो प्रेमाच्या या गणितात समाधान हे नसतंच मुळातकिंवा असं म्हणता येईल की समाधान आणि प्रेम हे समीकरण जुळुच शकत नाहीप्रेमात समाधान हे असूच शकत नाहीआपल्या मानवी स्वभावाचाच एक अंग म्हणजे समाधानी वृत्तीपण सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्रेमाचं गणितंच निराळं आहे होतेव्हा मला या व्यक्तीकडून इतकं प्रेम मिळालं आता मी समाधानी झालो किंवा मला या व्यक्तीकडून इतकं प्रेम मिळालं तर मी समाधानी होणारअसं कधी कुणीही म्हणत नाही आणि म्हणु देखील शकत नाही कारण काय एक तर प्रेम हे कुठल्याही मानकात मोजले जाऊ शकत नाहीतसेच दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही भावना देखील मानकात मोजता येत नाहीतेव्हा आपण असं म्हणु शकतो की,प्रेमात समाधन नसतंच

'' अश्रू तुझ्या नयनांतील ओठांनी प्यायलो मी

प्रेमात तुझ्या सारी तृप्ती जाणलो मी''

असं जरी आपण म्हणण्यापुरतं म्हटलं तरी आपण आपल्याच मनाला विचारल्यास उत्तर येतं ते वेगळंचप्रेमाचं हे असंच असते होप्रेमात पडलेल्यांना स्वार्थ हा नसतोच मुळीअगदी तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार होवून जातो

 

'' तुझ्या वाटेतले काटे मला उचलू दे

आणि फूलांनी सजवलेल्या वाटेवरपाऊल तुझे पडू दे''

         दोस्तो समाधान आणि प्रेम हे समीकरण जुळूच शकत नाही हेच खरंआपण फक्त नि फक्त शुध्द,निर्मळ भावनेने प्रेम करीत रहावं

'' प्रेमाची मी रागिणी प्रेमात भिजव रे मला प्रेमाची मी भुकेली प्रेमात रंगव रे मला

प्रेमाचा हा खेळ असाच तू खेळत रहा दर दिवशी सकाळी असाच तू भेटत रहा''