हेल्प...सेव द कंट्री...
कॅन वन इमॅजिन वर्किंग फॉर द फॉलोइंग कंपनी?
इट हॅज अ लिटील ओव्हर 500 एम्प्लॉइज वीथ द फॉलोइंग स्टॅटीस्टीक्स
29 हॅव बीन अक्युज्ड ऑफ स्पाउज अब्युज...
7 हॅव बीन अरेस्टेड फॉरफ्रॉड...
19 हॅव मोर दॅन थ्री क्रिमीनल केसेस पेंडींग अगेन्स्ट देम..
117 हॅव बीन चार्जड ऍन्ड आर बीइंग इन्व्हेस्टीगेटेड फॉर मर्डर , रेप , असॉल्ट , एक्सटॉर्शन , ऍन्ड रॉबरी.
71 कॅन नॉट गेट क्रेडीट ऑर लोन्स डयू टू बॅड क्रेडीट हिस्टरीज..
21आरकरन्ट डिफेन्डन्ट्स ऑन व्हेरीयस लॉसुट्स..
84 हॅव बीन इन्व्हॉल्व्ड इन ऑफेन्सेस ऍन्ड हॅव पेड फाईन्स..
कॅन यू गेस वॉट माइटी ऑर्गनाइजेशन धिस इज?
इट इज द 545 मेम्बर्स ऑफ द लोवर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑफ इंडीया दॅट वर्कस फॉर यू ऍन्ड मी..द सेम गृप क्रॅन्क्स आउट हंड्रेड्स ऑफ लॉज डिजाइन्ड टू कीप द रेस्ट ऑफ अस इन लाइन..
कॅन वी डू समथिंग अबाऊट इट?
ऍट लीस्ट , वी वील स्प्रेड द वर्ड अराऊंड युजिंग धिस माइटी मिडीयम कॉल्ड इंटरनेट ऍन्ड इ मेल.
क्रिएट अवेअरनेस (ऍज इफ पिपल डोन्ट नो ऑलरेडी !!)
हेल्प...सेव द कंट्री...
सध्या हा एक इ मेल जवळपास सगळया इंटरनेट हाताळणाऱ्यांच्या मेल बॉक्स मध्ये फिरतो आहे.मित्रांनो तुम्हीही कोणाला गेल्या आठवडयापासून अशाच आशयाचा इ मेल फॉरवर्ड केला असेल.मुंबई मध्ये भारताच्या इतिहासातील सगळयात मोठा दहशतवादी हल्ला झाल्यापासून आपल्या सगळयांचे डोळे एकदम खाडकन उघडले.आपण आपल्याच शहरात किती असुरक्षित आहोत हे आपल्या मनावर पुन्हा बिंबवल्या गेले.हा हल्ला काय आणि कसा झाला हे तर तुम्हा सगळयांनाच माहिती आहे.पण ह्या हल्ल्याचे आफ्टर इफेक्ट्स सगळयात जास्त जाणवले असतील तर ते सरकारला होय.. आतापर्यंत गाढ झोपेत असलेल्या सरकारने सुध्दा त्वरीत पावलं उचलत चौकशी वगैरे सुरू केली आणि दहशतवादाला धर्म नसतो वगैरे वगैरे कमेंटबाजी सुरू केली..(एरवी ह्या नेत्यांना ही गोष्ट का नाही दिसत??) खुर्ची आणि सत्ता वाचविण्याच्या नादात आपण कुठे काय करतोय आणि काय बोलतोय ह्याचंही भान ह्या मंत्री लोकांना राहिलं नाही आणि त्यामुळे आतापर्यंत शांत असलेल्या जनतेचा संयम संपला..सहनशक्तीलाही काही मर्यादा असते हे जनतेने दाखवून दिलं..ह्या दहशतवाद नावाच्या रोगासाठी काय उपाय करायला हवे ह्याची चर्चा आता प्रत्येक घरांघरांतून होताना आपल्याला दिसतेय..
एकूणच सरकारचा निष्क्रीयपणा षंढपणा आणि स्वार्थीपणाचे उघडपणे अख्ख्या जगासमोर दर्शन घडल्यावर आता साध्या लहान पोराचा सुध्दा सरकारवर कणभरसुध्दा विश्वास राहिलेला नाही.सरकारच्या भरवशावर देशाची आणि जनतेची सुरक्षा सोपवली तर कसा घात होतो हे अनुभवल्यावर आता श्रीमंत असो वा गरीब , स्त्री असो वा पुरूष , वृध्द असो वा बालक सगळया जनतेचा एकच सूर आहे आणि तो म्हणजे ''बस..अबबहुत हुआ..''आता स्वावलंबन शिकायचे.सगळी सूत्रं स्वतःच्या हातात घ्यायची व स्वतःची आणि देशाची सुरक्षा स्वतःच करायची..आता जो कुणी ह्या स्वार्थी आणि षंढ सरकारवर अवलंबून राहिल तो संपला अशीच जनतेची मानसिकता सध्या तयार होताना दिसून येत आहे.
शाळा , कॉलेजेस मधल्या वर्गावर्गांत इतकंच नव्हे तर फाईव्ह स्टार हॉटेल पासून साध्या चहाच्या टपरीपर्यंत सगळे आता जागे झाले आहेत.आणि प्रत्येकाच्या मनात झालेल्या घटनेविषयी चीड तर आहेच पण ह्या सगळयात सरकारचा जो स्टॅंड होता आणि काही मं~yाांनी जे बेजबाबदार आणि अतिशय संतापजनक असे वक्तव्य केले शिवाय इतक्या मोठया घटनेचा सुध्दा राजकिय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जनतेच्या रोषात अधिकच भर पडून जनतेमध्ये राजकारणी लोकांच्या विरोधाची मानसिकता तयार होते आहे.जे जागे झाले आहे त्यांना एकत्र आणा आणि जे अजूनही भाबडेपणाने सिस्टीमवर अवलंबून आहेत त्यांनाही जागे करा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
्दोस्तो सुरूवातीलाच जो इ -मेलतुम्ही वाचलात हा त्या सगळयांना जागं करण्याच्या प्रयत्नातीलच एक प्रयत्न...हा मेल वाचून आपल्याला कळतं की आपण कोणाला विश्वासाने निवडून दिलं आहे आणि हे लोक तिथे काय देशाची वाट लावत आहेत.आपल्या देशाच्या सिस्टीममध्ये इतके गुन्हेगार आहेत हे तुम्हाला माहिती झाल्यावर तुमची रिऍक्शन काय असेल?हीच की सगळे सारखेच..कोणाला निवडून देणार?त्या पेक्षा वोटींगवर बहिष्कार टाकलेलाच बरा..
मित्रांनो् आपल्या मुंबईच्या मित्रांची रिऍक्शन ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती...सगळयांची अशी एक मानसिकता तयार झाली आहे की ''तुम्ही राजीनामे देऊन कोणावर उपकार करत नाही आहात..आमचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही.. यामुळे आम्हाला आता कोणत्याच पक्षाचा नेता नको.आम्ही वोटींग करणार नाही कारण कोणीच मत देण्यायोग्य नाही.'' 4 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये जी लाखो लोकांची विशाल रॅली निघाली होती ती तुम्ही आम्ही सगळयांनीच बघितली.त्यात त्यांचा असाच सूर होता की '' इंडीया नीड्स लीडर्स ऍन्ड नॉट डीलर्स..'' आणि म्हणूनच त्या सगळयांनी अख्ख्या भारतीय जनतेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
एस एम एस च्या आणि इ मेल्स च्या माध्यमातून सगळे एकमेकांना जागृत करण्याच्या कामाला लागले आहेत.त्या एस एम एस मधून सगळयांचा आपल्या शूर पोलिस आणि कमांडो आणि जवानांविषयीचा अभिमान आणि राजकारणी लोकांविषयीचा आत्यंतिक संताप दिसून येतो.
''थँक्स टू कॉप्स ऍन्ड कमांडोज, वी नीड नॉट वरी अबाऊट दोज हू हॅव केम थ्रू बोट्स..
बट , वी मस्ट वरी अबाऊट दोज हू कम थ्रू अवर वोट्स...''
किंवा ''फॉरगिविंग टेररीस्ट इज लेफ्ट टू गॉड... बट फिक्सींग देअर अपॉइंटमेंट वीथ गॉड इज अवर रिस्पॉन्सिबिलीटी..''
गेल्या आठवडाभरापासून हे आणि असे बरेच एस एम एस सगळयांच्या मोबाईल्सच्या इनबॉक्समध्ये आपल्याला सापडतीलच...अतिरेक्यांशी लढताना ज्यांनी आपले प्राण गमावले अश्या सगळयांना तर सरकारने देवत्व बहाल केले पाहिजे कारण ते देवदूतासारखे आपलं रक्षण करण्यास आले नसते तर आज हॉटेल ताज पासून तर पान टपरी पर्यंत सगळं हायजॅक झालं असतं..
ह्या शूरवीरांचा आदर करण्याचं आणि ज्यांनी आपले जवळचे लोक ह्या लर्र्र्ढाईमध्ये गमावले त्यांचं सांत्वन करण्याचं सोडून काही नेत्यांनीत्यांचा अपमान केला.
शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन्् ह्यांच्या घरच्यांचा जो अपमान केरळच्या मंत्रीमहोदयांनी केला ते पाहून तर जनतेच्या रागाने सीमा पार केली.आपल्या देशातल्या राजकारणी लोकांना अजूनही कशाला प्रायॉरिटी द्यायला हवी हे कळत नाही हे सुध्दा आता जनतेच्या मनाने घेरले आहे.आणि जनता ह्याची एकमेकांमध्ये चर्चा करते आहे की ''आपल्या देशात शूटर ऑलिम्पीकच्या खेळात गोल्ड मेडल मिळवतो व त्याला तीन कोटी रूपये व पुरस्कार दिल्या जातात.दुसरा शूटर अतिरेक्यांशी लढताना व देशाचे रक्षण करताना शहिद होतो.पण त्याच्या घरच्यांना मिळतात भीक दिल्यासारखे पाच लाख रूपये व अपमान...वाह रे आपला भारत !''
ही अशी सगळी मानसिकता सध्या देशामध्ये तयार होते आहे.प्रत्येक जण जागृत झाला आहे पण ही लाट आता अशीच कायम राहायला हवी.नाहीतर पुन्हा कुठला हल्ला होईपर्यंत जैसे थे!सगळे थंड होतील.असं व्हायला नको..आज भारत देशात सगळयात जास्त संख्या युवांची आहे तरीही का आपल्याकडे पोलिसांची कमतरता आहे? नुसता सरकारला दोष देऊन चालणार नाही.ह्यात आपणही कुठेतरी चुकतो.आता तरी ह्या चुका सुधारायला हव्यात.मला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडायला हवी.प्रत्येकाने डोळसपणे सद्सद्विवेकबुध्दी वापरून मतदान केले पाहिजे.मतदानावर बहिष्कार टाकून उपयोगाचे नाही.शेवटी कोणाच्या हातात देश चालवायला द्यायचा हे अधिकार आपल्यालाच दिले आहेत.त्यामुळे आपण सुध्दा जबाबदारीने वागले पाहिजे.देशाच्या रा्जकारणात सक्रीय सहभाग तर घेतलाच पाहिजे.. शाहरूख ,हृतिकआणि कॅटरीना , करीना बनण्याची स्वप्न पाहणं खूप झालं..आता देशाला गरज आहे मेजर संदीप उन्नीकृष्णन् सारख्या शूर जवानांची आणि किरण बेदींसारख्या कर्तबगार पोलिस ऑफिसर्सची..आपल्यातूनचहे संदीप उन्नीकृष्णन् आणि किरण बेदी हजारोंच्या संख्येने निर्माण व्हायला हवेत...
''यह मुर्दो सी खामोश जिंदगी क्या जीना..अगर इस दुनिया मे रहना है तो कोहराम मचादो यारो...''
शेवटी गरज आहे ही जागृतीची लाट कायम ठेवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्यात प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलण्याची....
''रख हौसला बुलंद ये मनझर भी आएगा..प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा..
गिरते ही सही सवार मैदान ए जंग मे..वह तिल्फ क्या गिरेंगे जो घुटनो के बल चले...''
-------------vaidehi
--------------
No comments:
Post a Comment