ह्या भ्रष्टाचाराला कंटाळलो बुवा...राजेहो ..काही राजेशाही उपाय आहेत का ह्यावर ? केतन साळवे , नागपूर..
केतन साहेब...हा प्रश्न म्हणजे असा आहे की पहले मुर्गी या पहले अंडा..ह्या भ्रष्टाचाराला तर आम्हीही कंटाळलो आहोत हो...म्हणून तर त्या दिवशी मंदिरात गेल्यावर देवाला म्हटलं की जरा बघा बुवा डोळे उघडून...काय हालत झाली आहे तुमच्या भक्तांची...मी हे म्हणत असतानाच तिथे अचानक पुजारी काका अवतरले अन् मला म्हणाले..देवाकडे प्रार्थना पोहोचवायची आहे? एक अभिषेक करून टाकू आपण...हजार रूपये अभिषेकाचे आणि दोनशे एक्कावन्न माझी दक्षिणा...आता त्यांनी सरळ सरळ ऑफर दिल्यावर मी एकदा देवाकडे आणि एकदा त्या काकांकडे असं पाहिलं आणि तिर्थरूपांना विचारून कळवते असं म्हणून तिथून सटकले..म्हटलं यार..इथेही भ्रष्टाचार ?अब तो हाय कमांड को कंप्लेंट लेटर लिखनाहीच पडेगा असा विचार करून घरच्या देवाशी संवाद साधला..आता देवाने सुध्दा मंदिरात तो डायलॉग ऐकला असावा म्हणून त्याने पण माझ्या हाकेला प्रतिसाद म्हणून लगेच दर्शन दिलं..मी सरळ सरळ तू जो डायलॉग मारला तोच देवाला ऐकवला..तर देव म्हणे काय मागते गं..जरा काही सोपं माग...मला करता येण्यासारखं..शेवटी पाहतो बुवा प्रयत्न करून.असं म्हणून देव अंतर्धान पावला..आता देवापर्यंत तर मी कंप्लेंट पोहोचवली आहे.होईल काही ना काही..तूर्तास एक राजेशाही उपाय करून बघ..एक म्हणजे आपण कुठलंहीकामकरवून घेताना ऑफिसातल्या कर्मचाऱ्यांच्या बायकोच्या साडीची व्यवस्था करायची नाही..भलेही मग कितीही वेळ लागु देत..अबहम तो है टाईम के पक्के..वेळ कोण घालवेल त्यापेक्षा एक दोन नोटांमध्येकामहोत असेल तर बरं..सो हा उपाय तर कोणी करणार नाही..आज पुन्हा देवाशी संवाद साधते आणि टेंपररी उपाय त्यालाच विचारून तुला कळवते..ओक्के ?बाय...
No comments:
Post a Comment